| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
गुढीपाडवा दिनी मुरूड तालुक्यातील तेलवडे या गावी श्री हनुमान देवस्थान स्थापना दिनाचे औचित्य साधून 124 वा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने जलाभिषेक, लघुरुद्र, दिंडी, हरिपाठ, वारकरी सांप्रदायिक कीर्तन, भजन, गणेश स्तोत्र, मारूती स्तोत्र, महाप्रसाद असा धार्मिक कार्यक्रम पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत होणार आहे. याप्रसंगी संगीता येनपुरे-चोपडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून अनिकेत वारगे, ज्ञानेश्वर दळवी, मंजेश्री नाईक, तेजश्री नाईक आदी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. सर्व भक्तजनांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तेलवडे ग्रामस्थ मंडळ आणि अंजनीमाता महिला मंडळाने केले आहे.







