। उरण । वार्ताहर ।
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड जुनिअर कॉलेज ऑफ आर्टस सायन्स अँड कॉमर्स आवरे, तालुका उरण या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा वर्धापनदिन रविवारी (दि.2) करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी, स्वच्छता प्रचार, प्रभात फेरीने करण्यात आली. वाचन संस्कृती निर्माण व्हावी, स्वच्छता संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने घोषवाक्ये, घोषणा व पालखीचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ सहभागी होते. याप्रसंगी प्रणिता म्हात्रे, समाधान म्हात्रे, शीतल म्हात्रे, सविता वर्तक, रत्नमाला म्हात्रे, मनोज पाटील, एच.के. गावंड, नागेंद्र म्हात्रे, सविता गावंड, चेतन म्हात्रे, वशेणी, खोपटे, चिरनेर, सारडे, पाणदिवे गावातील पालक प्रतिनिधी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.