। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील पेझारी गावातील वरची आळी येथे चौलचे नाथसिध्द नारायण वार्डे गुरूजी व श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख दिगंबर राणे यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या श्री कानिफनाथ मंदिराचा 10 वा वर्धापनदिन उत्सव बुधवारी (दि.4) आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अभिषेक व पूजा, नवनाथांच्या पोथीतील 12 व्या अध्यायाचे वाचन, श्रीसत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद, कानिफनाथ महाराजांच्या पालखी सोहळा व नवनाथांच्या आरतीने पालखी परिक्रमेचा समारोप असे कार्यक्रम साजरे होणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी या कानिफनाथ मंदिराच्या वर्धापनदिन उत्सवास उपस्थित राहून आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.