मजगावच्या मल्हारी दत्त देवस्थानाची जयंती

। मुरूड । वार्ताहर ।
मजगाव येथील मल्हारी दत्त देवस्थानच्या दत्त जयंती उत्सवाला गुरुवारी (दि.1) सुरुवात होणार आहे. 8 डिसेंबरपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने हरिपाठ व भव्य श्री हरि कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी रात्री 9 वाजता एकनाथ महाराज वाडीकर,एकनाथ महाराज यांचे कीर्तन, शुक्रवारी(दि.2) सुदाम पालवे यांचे कीर्तन, शनिवारी (दि.3) रात्री 9 वाजता ज्ञानेश्‍वरदास महाराज सावर्डेकर यांचे कीर्तन, रविवारी (दि.4) रात्री 9 वाजता तुलसीराम महाराज लबडे यांचे कीर्तन, सोमवारी (दि.5) रात्री 9 वाजता संतोष महाराज पवार यांचे कीर्तन, मंगळवारी (दि.6) गौरीताई सांगळे यांचे कीर्तन, बुधवारी (दि.7) सायंकाळी 7 वाजता व गुरुवारी (दि.8) सकाळी 10 वाजता संतोष महाराज गारुळे यांचे कीर्तन होणार आहे.

बुधवारी (दि.7) सकाळी 5 वाजता दत्त मुर्तीला सार्वजनिक अभिषेक व काकड आरती, दुपारी 12 वाजता दत्त भिक्षा फेरी, सायंकाळी 7 वाजता दत्त जन्म कीर्तन, गुरुवारी (दि.8) डिसेंबर सकाळी 8वा.विश्‍वशांती यज्ञ, सकाळी 10 वा.श्रीहरि किर्तन काल्याचे किर्तन , दुपारी 1 वाजता काल्याचा महाप्रसाद तर सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळा आयोजित करण्यात आल्याचे मल्हारी दत्त देवस्थान व भक्त मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Exit mobile version