मारुती मंदिराचा वर्धापनदिन

| पनवेल | वार्ताहर |

येथील प्राचीन अशा दासमारुतीचा वर्धापनदिन संपन्न झाला. यानिमित्ताने वर्षा सहस्रबुद्धे यांचे कीर्तन संपन्न झाले. त्याना प्रकाश भारद्वाज यांनी संवादिनी तर योगेश गायकवाड यांनी तबलासाथ केली.

रामदास (मारुती) मंदिराची स्थापना 1916 साली झाली तेव्हापासून आजपर्यंत विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. हनुमान जयंती, परशुराम जयंती, शंकराचार्य जयंती, संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा, संत नामदेव महाराज पुण्यतिथी, तुकाराम बीज ते नाथषष्ठी, अशा विविध संतांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त कीर्तनसोहळे संपन्न होतात. दासनवमी उत्सव दहा दिवस संपन्न होतो. या काळात काकडआरती, दासबोध वाचन, भिक्षा, महिलांचे विविध कार्यक्रम व रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात. चातुर्मास व अधिक मासामधे प्रवचने वगैरे आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होतात. गेली 107 वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे धार येथील अण्णासाहेब फडके यांच्या संकल्पनेतून ही दासमारुतीची मूर्ती घडवण्यात आली असून या मुद्रेतील सुबक मूर्ती या परिसरात कोठेही नाही अशी माहिती मंदिराचे विश्‍वस्त चंद्रशेखर खरे यांनी दिली.

Exit mobile version