रोहितची निवृत्तीबाबतची घोषणा

एकदिवसीय विश्‍वकरंडक खेळण्याची इच्छा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट संघाचा 36 वर्षीय कर्णधार रोहित शर्मा याला आणखी काही वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. सध्या तरी निवृत्तीचा विचार मनामध्ये नाही. 2027 मधील एकदिवसीय विश्‍वकरंडक खेळण्याची इच्छा आहे, असे स्पष्ट मत रोहित शर्मा याने यू-ट्युबवरील एका शोमध्ये व्यक्त केले.

रोहित याप्रसंगी म्हणाला, मी लहानपणापासून एकदिवसीय विश्‍वकरंडकाचा थरार बघतच मोठा झालो आहे. त्यामुळे माझ्यासाठी एकदिवसीय विश्‍वकरंडकच महत्त्वाचा आहे. याशिवाय 2025 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळायला आवडेल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पोहोचायला हवा.

आयुष्यात पुढे काय होईल हे सांगता येत नाही. माझ्याकडून चांगली कामगिरी होत आहे. त्यामुळे सध्या तरी मी निवृत्तीचा विचार केलेला नाही. देशाला एकदिवसीय विश्‍वकरंडक जिंकून द्यायचा आहे.

Exit mobile version