मुरुडमध्ये आरक्षण सोडत जाहीर

। मुरुड । प्रतिनिधी ।
मुरुड-जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता सोमवार (दि.13) सकाळी 11 वा. मा जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये आरक्षण सोडत नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात नियंत्रण अधिकारी तथा अध्यक्ष नितिन राऊत व नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली.
आरक्षणानुसार बहुसदस्यीय प्रभार रचना सदस्यांसाठी वार्ड क्रमांक 1 खुला महिला व सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 2 खुला महिला व सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 3 खुला महिला व सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 4 महिला खुला व सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 4 खुला महिला व सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 5 खुला महिला व सर्व साधारण, वार्ड क्रमांक 6 खुला महिला व सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 7 खुला महिला व सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 8अनु.जमाती सर्वसाधारण व महिला, वार्ड क्रमांक 9 अनु.जमाती महिला व सर्वसाधारण, वार्ड क्रमांक 10अनु.जमाती महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पाडण्यात आले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, नरेंद्र नांदगावकर, प्रकाश आरेकर, सुदेश माळी, सतिष जंजिरकर, गोपाळ चव्हाण, ललीत जैन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version