| चणेरा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदासाठी असलेले आरक्षण घोषित करण्यात आले. रोहा नगरपालिकेला ओबीसी महिला हे आरक्षण असणार आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदेच्या कै.द.ग. तटकरे सभागृहात अष्टमी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका आरक्षण व सोडत कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ‘अ’ महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 ‘अ’ महिला व 2 ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 ‘अ’ महिला व ‘ब’ नागरिक मागास प्रवर्ग (सर्वसाधारण ), प्रभाग क्रमांक 4 ‘अ’ महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 ‘अ’ महिला व ‘ब’ नागरिक मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक 6 ‘अ’ महिला 6 व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ महिला (नागरिक मागास प्रवर्ग) व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 ‘अ’ महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ महिला (नागरिक मागास प्रवर्ग) व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ (महिला नागरिक मागास प्रवर्ग), ‘ब’ सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता चांगलीच घोडदौड सुरू झालेली आहे. रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी महिला ओबीसी आरक्षण पडल्यानंतर जुन्या नगरसेवकांपैकी पाच नावांची प्रामुख्याने शहरात चर्चा आहे.





