| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचा वर्षपुर्ती सोहळा गडपुजन सेवानिवृत्त सैनिक निलेश दिसले यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी 22 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. गडाची ग्रामदेवता आई अन्साई देवी, गडावरील देवदेवतांची गडाचे महाद्वार आणि दुर्ग गडपूजन त्याच बरोबर गड संवर्धन मोहिमेला लागणारे अवजार तसेच शास्त्रांचे पूजन या प्रसंगी करण्यात आले. यावेळी परम पवित्र भगवा ध्वज फडकविण्यात आला. तसेच गडाची माता अन्साई आई भवानी मातेची आराधना करत भंडाऱ्याची उधळण करत शिव छत्रपती शिवरायांचे जय घोष करीत या सोहळ्यात लाठीकाठी खेळ सादर करूण सुरगडाच्या शिलेदारांनी या प्रसंगी जल्लोष केला.
या वर्षपुर्ती सोहळ्यात सुरगडाच्या शिलेदारांसोबत गडाच्या घेऱ्यात असणाऱ्या गावातील प्रत्येकाने सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमासाठी वन्यजीवरक्षक सामाजिक संस्थेचे सागर दहिंबेकर, डॉ. शामभाऊ लोखंडे, अनिल महाडिक, नंदकुमार कळमकर, रविंद्र लोखंडे, भरत महाडिक, मधुकर जाधव सुरेश पार्टे, धीरज येरूणकर, महेंद्र पार्टे, भरत महाडीक यांच्यासह बहुसंख्येने गडप्रेमी यांची उपस्थिती होती.
सुरगड संवर्धन संस्थेचा वर्षपुर्ती सोहळा
