| नागोठणे | प्रतिनिधी |
रोहा तालुका प्राथमिक शिक्षक सेवा भावी संघाचा वार्षिक मेळावा बुधवारी (दि.24) जाखमाता मंदिर वेलशेतच्या भव्य प्रांगणात पार पडला. मेळाव्यादरम्यान पिगोंडेचे माजी सरपंच संतोष कोळी, वेलशेत गावाचे प्रमुख अनिल पाटील, बळीराम बडे, अंकुश ताडकर, रोशन पारंगे, उपसरपंच सखाराम घासे, कांचन माळी, रंजना माळी व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनाही गौरवण्यात आले. तालुका अध्यक्ष गजानन गुरव यांनी, सेवानिवृत्ताची कामे आपलीच संघटना जातीने करीत आहे. यापुढे प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले.
यावेळी दामोदर कडू यांनी मार्गदर्शन करताना संगितले की, निवृत्तीवेतन धारक शासनावर नाराज असून विवंचनेत आहेत. सेवानिवृत्त शिक्षक हे गंभीर आजाराने त्रस्थ आहेत. तसेच, इतर प्रलंबित कामे पूर्ण होत नसल्याने याच ठिकाणी तसा ठराव घेऊन उपोषण करण्याची तयारी करावी. जिल्हाअध्यक्ष तुकाराम खांडेकर यांनी सांगितले की, संघटनेचे काम करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे ते पार पाडण्याचे मी पुर्णपणे आभिवचन देतो. यावेळी जिल्हा चिटणीस रमेश लखीमले, जिल्हा उपाध्यक्ष विनायक सोनकर, जिल्हा सहचिटणीस मुरलीधर ठमके, जिल्हा संघटक मुकुंद गंभे, जिल्हा खजिनदार दीनानाथ जाधव, जिल्हा सल्लागार वसंत शिंदे, सहचिटणीस सुदाम मेणे, तालुका अध्यक्ष उरण अंकुश पाटील व सर्व कार्यकारणी सदस्य तालुका अध्यक्ष माणगाव मारुती कासार व सर्व कार्यकारणी सदस्य, रोहा तालुका अध्यक्ष गजानन गुरव व त्यांचे कार्यकारणी सदस्य प्रेमाने कार्यक्रमात उपस्थित होते.






