पाच्छापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन

| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा पाच्छापूर तालुका सुधागड येथे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार, दि.14 फेब्रुवारी रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमांतर्गत 24 सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये लावणी, लोकनृत्य, देशभक्तीपर नृत्य, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आल्या. या संपूर्ण कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शेवटी उपस्थित मान्यवर पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन भिलारे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमसाठी शिक्षक वृंद रमेश पवार, कमलाकर तांडेल, धनाजी कोपनर, राणी कापरे, सुनीता कडाले, धर्माजी तांडेल, प्रल्हाद गादेवार, राजू बांगारे यांनी मोलाचे योगदान दिले शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्ञानेश्‍वर ओंबळे, एकनाथ चांदे, अमिता डिंगळे, हौशी हीलम, सुषमा वारंगे यांनी कार्यक्रम यशस्वी करणे करता सहकार्य केले.

या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुखा कल्पना पाटील, शाळा समिती अध्यक्ष महेश वारंगे व सर्व सदस्य, पंचायत समिती सुधागडचे माजी सभापती राम शिद, माजी मुख्याध्यापक कमलाकर शिंदे, माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक दीपक माली, शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ विलास तांबट, अनंत जोरे, श्याम बावधाने, विलास चांदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version