| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म. वेदक विद्यामंदिर, प्राथमिक विद्यामंदिर आणि कला- वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन कलादीप मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी आदर्श शिक्षक म्हणून सहा शिक्षक विनोद कोलवणकर, पन्हेळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा व्यवहारे, आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पन्हेळी हायस्कूलचे भिमराज जाधव तर आदर्श विद्यार्थी म्हणून इक्राम कर्देकर व मनाली मोरे या विध्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन 30 डिसेंबर,2022 रोजी पार पडले. यावेळी आदर्श शिक्षक म्हणून प्रा वाले आर बी, आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती सुतार यांना सन्मानित करण्यात आले. तर कला शाखा प्रमिला भोईर, वाणिज्य शाखा वंदना शिगवण आणि विज्ञान शाखेतून धनश्री सर्जे व मधुर कांबळे या विध्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन माजी विद्यार्थी रणजित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त चित्रकला व रांगोळी प्रदर्शन, आनंद मेळावा, फनी गेम्स, प्रश्नमंजुषा वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वार्षिक स्नेह संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.