अंजुमन महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा

| आगरदांडा | वार्ताहर |

अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड-जंजिरा येथे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी जंजिरा फेस्ट चे आयोजन करण्यात येते. 13 ते 15 डिसेंबर दरम्यान जंजिरा फेस्ट अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे.

मंगळवारी प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये कबड्डी, डॉज बॉल, बॅडमिंटन, कॅरम, थ्रो बॉल, खो-खो, टेबल टेनिस, चेस, शॉटपुट, भाला फेक, डिस्कस थ्रो, क्रिकेट, लंगडी, लगोडी, व्हॉली बॉल इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

वार्षिक क्रीडा स्पर्धांसाठी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे चेअरमन जैनुद्दीन कादिरी व सदस्यांमध्ये रहीम कबले, अल्ताफ मलिक, इम्रान मलिक, तौसिफ़ फत्ते, इस्माईल शेख यांच्या तर्फे सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धांचे आयोजन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शोऐब खान व सदस्य प्रा. नितीन पवार, डॉ. स्वाती खराडे, डॉ. अमानुल्लाह पठाण, प्रा. अल्ताफ फकीर, प्रा. साराह कडू, प्रा. इफरा दाते यांच्या विशेष प्रयत्नाने करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये युसूफ कादिरी, वाहीब डावरे, अरफात लसने, झिशान पठाण, मदिहा पांगारकर, उकये रिफा, नौरीन घलटे, निदा मुक्री, इकरा दरोगे, हाफिज आयेशा, टाके आयेशा, लांबाते कैफ, माळी ऋतिका, चोगले नईमा, भगत रिद्धी, मुकादम सहिमा, आदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न घेत आहेत.

Exit mobile version