| अलिबाग । वार्ताहर ।
आरसीएफ सेकंडरी अॅण्ड हायर सेकंडरी स्कुल कुरुळ अलिबाग शाळेत विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. सन 2022-23 चे शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले होते. या स्पर्धांचे उद्घाटन भालचंद्र देषपांडे, मुख्य प्रशासन प्रबंधक आर.सी.एफ.थळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेष पाटील, संविधा संदीप जाधव, कांचन प्रमोद उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये इ.05 वी ते इ.12 वी चे विदयार्थी सहभागी झाले असून यास्पर्धा 14 वर्ष, 17 वर्ष, 19 वष अशा गटात घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धा यषस्वी होण्याकरीतारमेष केषव भगत ,सरिता नाईक, निलाक्षी गोखले, पदमश्री चौगुले, विजयकुमार पोतदार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.