| चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर येथील उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील यांचा वाढदिवस प्राथमिक आश्रम शाळा चिरनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापून, साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सुनिता खारपाटील, राजू मुंबईकर, बाजीराव परदेशी, सतीश मोरे, हादेव डोईफोडे,पांडुरंग वरकडे, खरे पिचड तसेच अन्य शिक्षक वर्ग उपस्थित होता. प्रारंभी वाढदिवसाचा केक कापल्यानंतर विद्यार्थ्यांना केक व फ्रुट ज्यूसचे तसेच वह्याचे वाटप करण्यात आले.
यानंतर पी.पी.खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शिक्षक वर्गाच्या वतीने केक कापून, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी भव्य रांगोळी काढण्यात आली होती.यावेळी मुख्याध्यापक सूरदास राऊत, प्रशासकीय अधिकारी आर.एन. पाटील, पर्यवेक्षक आनंद चिरलेकर, मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे, मुख्याध्यापिका मंदा घरत तसेच अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.तर त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कंपनीसाठी आणलेल्या नवीन आधुनिक यंत्रसामुग्रीचे उद्घाटन पी.पी.खारपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी मोबाईलद्वारे तर काहींनी प्रत्यक्ष भेट घेऊन, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यात आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, माजी आ.मनोहरशेठ भोईर, महेंद्र घरत,सिडकोचे श्री मुंडे, जेएनपीटीचे श्री चव्हाण, सिडकोचे चीफ इंजिनियर गोडबोले,तसेच सिडकोचे श्री म्हात्रे या सर्वांनी त्यांचे मोबाईलद्वारे शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
आरटीओचे किरण पाटील, संतोष ठाकूर, अलंकार परदेशी, वसंत चिर्लेकर, समीरशेठ खारपाटील, सागरशेठ खारपाटील, रमेश फोफेरकर, संतोष ठाकूर, सचिन घबाडी, इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत, शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, शुभांगी पाटील, पोलीस पाटील संजय पाटील शशांक ठाकूर, गणेश चिरनेरकर आदींनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.