आणखी एका बॉक्साईट प्रकल्पाची घोषणा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडी येथे अजून एका बॅक्साईड उत्खनन प्रकल्पाची घोषणा राज्यशासनाने केली असून या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी 5 सप्टेंबर रोजी कात्रादेवी मंगल कार्यालय कात्रादेवी सागवे येथे होणार आहे. रिफायनरी प्रकल्पाची प्रतिक्षा करता करता आता समुद्रकिनारपट्टी पोखरणारे बॉक्साईट उत्खननाचे प्रकल्प राजापूर तालुकावासियांच्या माथी मारले जात असल्याने याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.

नाणार परिसरातील सुमारे 145 हेक्टरवर होणार्‍या बॉक्साईट उत्खननाच्या प्रकल्पाची जनसुनावणी 29 ऑगस्ट रोजी नाणार येथे होणार आहे. याबाबतची जाहीर नोटीस शासनाने प्रसिद्ध करुन आठवड्याचा कालावधी लोटण्याअगोदरच आता शासनाने सागवे घोडेपोईवाडी येथे प्रस्तावित असणार्‍या दुसर्‍या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या जनसुनावनीची तारीख जाहीर केली आहे. यामुळे गणपती सणांच्या पार्श्‍वभुमीवर या भागात रिफायनरीच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा बॉक्साईट उत्खनन विरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version