। पुणे । प्रतिनिधी ।
पी.एफ.आयच्या विरोधात राज्यभरात पुन्हा छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. संभाजीनगरसह मराठवाड्यातून 21 जणांना अटक आली आहे. तर दुसरीकडे धक्कादायक माहिती हाती आली आहे. भाजपची सत्ता असलेल्या पुणे पालिकेने वादग्रस्त पी.एफ.आयची मदत घेतली होती.
वादग्रस्त पी.एफ.आय संघटनेने पुणे महापालिकेसोबत काम केल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेने वादग्रस्त अंत्यविधीबाबत मदत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर तत्कालीन महापौरांनी करार रद्द केला होता.
बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार
पीएफआयवर बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. छाप्यांमधील पुराव्यांआधारे बंदीचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गुप्तचर खात्याच्या हाती पी.एफ.आय कोणते कट रचत होती याची माहिती लागली आहे. तसेच पी.एफ.आयवर बंदी घालावी, अशी अनेक राज्यांचीही मागणी आहे. 15 राज्यांमध्ये 106 जागांवर एन.आय.ए व ईडीने छापे मारले होते. त्यानंतर आता पी.एफ.आयवर बंदीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.