। मुंबई । वृत्तसंस्था ।
कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणारे उद्धव ठाकरे गटातील हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र थेट मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांसोबत विधानभवनामध्ये प्रवेश केला.