जंगलात बांधुन ठेवलेल्या महिलेचा जबाब

पतीनेच इंजेक्शन देऊन साखळीले बांधले

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत एक वृद्ध महिला येथील गुराखी आणि शेतकऱ्याला आढळून आली होती. एक वृद्ध महिला झाडाला साखळीने बांधलेली होती. अनेक दिवसांपासून तिला तिथे बांधण्यात आल्याच प्रथमदर्शनीय दिसत होते. अनेक दिवसांपासून उपाशी आणि तहानलेली महिला पाहून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेनंतर सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगल परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.

आढळलेल्या या महिलेची पोलिसांनी सुटका केल्यानंतर तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला गोव्यात हलवण्यात आले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास करताना तिची ओळख पटल्याच सांगण्यात आले आहे. ही महिला मूळची अमेरिकेची असून सध्या ती तामिळनाडूमध्ये राहत होती. कारण पोलिसांना या महिलेकडे अमेरिकन पासपोर्ट फोटोकॉपीशिवाय तमिळनाडूचा पत्ता असणारे आधार कार्ड, रेशन कार्डही मिळालेले आहे. तसेच, या महिलेने लिहीलेल्या एका पत्रात तिचे नाव ललिता कायी कुमार असून ती मानसिक आजारी असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणात अमेरिकन दुतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. ललिता ही उच्च शिक्षित असून अमेरिकेत प्रसिद्ध बेली डान्सर आणि योग शिक्षक होती. पुढील योगाचे शिक्षण घेण्यासाठी ती 10 वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडूमध्ये आली होती. तामिळनाडूमधून ती महाराष्ट्रातील सांवतवाडीमधील जंगलात कशी पोहोचली, हा मोठा प्रश्न पोलीसांसमोर आहे.

या महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आवाहन आता पोलिसांसमोर आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासकामी गेली असून तेथील तपासानंतर सत्यता समोर येणार आहे. तर, पतीला ताब्यात घेतल्यावर त्या महिलेला कधी व कशी बांधण्यात आली हे उलगडणार आहे.


पतीनेच सोडले जंगलात
अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने ती अशक्त झाली आहे. त्यामुळे प्रथम तिने पोलिसांना तिच्यासोबत काय झाले याबद्दल सांगितले नाही. मात्र, उपचारानंतर तिने एका चिठ्ठीवर इंग्रजीत तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिले. त्या चिठ्ठीत तिने असा दावा केला की, गेल्या 40 दिवसांपासून ती जंगलात होती. तिथे ती 40 दिवसांपासून उपाशी होती. त्याशिवाय पतीनेच जंगलात झाडाला साखळदंडाने बांधल्याचे तिने या पत्रात सांगितले आहे. पतीने तिला इंजेक्शन देऊन जंगलात सोडले होते. या इंजेक्शनमुळे तिचा जबडा उघडत नव्हता.
Exit mobile version