महाराष्ट्र अंनिसतर्फे व्यसनविरोधी व फटाकेमुक्त पंधरवडा

| पाली/गोमाशी | वार्ताहर |
अनेकजन दारूचे पॅक रिचवत सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करतात. मद्य व व्यसनापासून लोकांना, खासकरून तरुणांना परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कल्पकतेतून साकारलेली चला व्यसन बदनाम करूयाफ ही व्यसन विरोधी मोहीम महा अंनिस मागील अनेक वर्षे राबवत आहे. या मोहिमेंतर्गत 15 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये व्यसनविरोधी पंधरवडा राबविला जात आहे. रायगड जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

या पंधरवाड्यांतर्गत व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत ऑनलाईन/ऑफलाईन व्याख्यानाचे आयोजन करणे. सोशल मीडियावर व्यसनविरोधी पोस्ट प्रसारित करणे. फटाक्याच्या दुष्परिणामाची पत्रके वाटणे व प्रत्यक्ष 31 डिसेंबरला दुधाचे वाटप करणे याद्वारे प्रबोधन करणे. 31 डिसेंबरला ङ्गदारू नको दूध प्या, फटाके नको भेटवस्तू द्याफ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करणे, शाळा कॉलेजमध्ये दाखवणे, यासारखे उपक्रम राबविले जात आहेत.

अनोखा उपक्रम
मागील वर्षी अंनिस पेण, अलिबाग, खोपोली आदी शाखेने हा उपक्रम राबविला होता. अंनिस पेण शाखेतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. तसेच पालीतील संघर्ष ग्रुप व फक्त पाली विकास ग्रुपतर्फे 2020 साली दारूचा नव्हे, द दुधाचाफ म्हणत दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमात पालीकरांनी व भाविकांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

31 डिसेंबर ला व्यसनाचे सर्वाधिक उदात्तीकरण होताना. या मुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे टाळण्यासाठी व प्रबोधन होण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे व्यसन विरोधी व फटाकेमुक्त पंधरवडा राबविला जातो. जिल्ह्यात उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. – मोहन भोईर, जिल्हा कार्याध्यक्ष, महा. अंनिस, रायगड

Exit mobile version