विद्यार्थ्यांना अंमली पदार्थां विरोधी जनजागृती

| कोलाड | प्रतिनिधि |

रोहे तालुक्यातील कोलाड पोलीस च्या मार्फत द.ग.तटकरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. आजची तरूणाई ही अंमली पदार्थ च्या विळख्यात सापडत असल्याने त्याना वेळीच आला घालण्यासाठी कोलाड पोलिसांच्या वतीने शुक्रवारी (दि.9) रोजी कोलाड येथील द.ग.तटकरे हाईस्कूल व. ज्युनिअर कॉलेज येथे व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या या विषयावर 7वी ते 10 वी. विद्यार्थ्यांकरिता पोस्टर स्पर्धा व 11ते 12 वी चे विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धेत दोन्ही गटांमध्ये 40/45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी दोन्ही गटातून 6 विद्यार्थी विजय झाले त्याना सन्मानित करण्यात आले. कोलाड पोलीस सपोनि नितीन मोहिते, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर यावेळी नरेश पाटील व सहकारी उपस्थित होते.

Exit mobile version