महिलादिनी महागाई विरोधी निदर्शने

| उरण । वार्ताहर ।

महिलांच्या हक्काच्या दिनाचे निमित्त साधत रायगड जिल्हा जनवादी महिला संघटनेच्या वतीने बुधवारी उरणच्या गांधी चौकात गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. गॅस दरवाढ मागे घ्या, महागाई कमी करा, बेरोजगारांना काम द्या, सर्वसामान्य कामगार, कष्टकरी, भूमिहीनाना रेशनवर मोफत धान्य द्या, आशा वर्कर ना मानधन आणि सुविधा द्या आदी मागण्याच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.

निदर्शनात जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, अमिता ठाकूर, कुसुम ठाकूर, चंपा पाटील, रसिका घरत, संजय ठाकूर यांची भाषणे झाली.

Exit mobile version