280 चाचणीपैकी 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
। खोपोली । प्रतिनिधी ।
राज्यात कोरोना रूग्णसंख्या घटत असली तरी महानगरात विकेंड लॉकडाऊन असतानाही वर्षासहलीसाठी कर्जत, चौक परिसरात मुंबई महानगरातील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. यादरम्यान कोरोनाचा संसर्ग तालुक्यात पसरू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चौक तालुका खालापूर, रायगड अंतर्गत रॅपिड अँटिजन कॅम्प कर्जत फाटा येथे घेण्यात आला. यादरम्यान 280 अँटिजन चाचणी करण्यात आली, त्यापैकी सहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे यांनी दिली.
अनेकांचे फार्महाऊस खालापूर, कर्जत तालुक्यात असल्यामुळे विकेंड लॉकडाऊनलस नागरिक बाहेर पडत असल्यामुळे खालापूर तालुक्यात कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पवार, डॉ.कार्तिक कपूर वैैद्यकीय कर्मचारी आणि खालापूर पोलीस प्रशासनाची मदत घेत कर्जत फाटा येथे रॅपिड अँटिजन कॅम्प घेण्यात आला. खालापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल सावंत देसाई उपस्थित होते.