। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यात साचारबंदीसह विकेंड लॉकडाऊन सुरू केले आहे. यांच अंनुषगाने मुरुड तालुक्यातही शनिवार, रविवार कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनला मुरूडसह पंचक्रोशीत भागात विकेंड लॉकडाऊनला काही नागरिकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काही नागरिकांकडून उल्लंघन होताना दिसत आहे. उल्लंघन करणार्या नागरिकांवर मुरुड पोलीस कारवाई करताना दिसत होते.
पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन वाणी, पोलीस हवालदार संतोष पाटील, पोलीस शिपाई परेश म्हात्रे, पोलीस शिपाई विक्रांत बांधणकर, महिला पोलीस शिपाई प्रिती वारीक, आरएसपी अधिकारी आशिष बुल्लू, होमगार्ड मंगेश कौलकर, होमगार्ड सार्थक शेडगे, होमगार्ड विकास वाघमारे या टीमने शहरात विनामास्क फिरणार्या 58 जणांवर 29 हजार रुपये दंड, निर्बंधांचे उल्लंघन करणार्या 11 जणांवर 2200 रुपये दंड तर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या 49 जणांवर 17 हजार 700 रुपये दंड असे एकूण 49 हजार 100 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मुरुड तालुक्यात कोरोना पॉझटिव्ह रूग्ण वाढत आहेत. त्याबरोबर मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. तरी सरकारने कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्याकरिता नियमावली दिली आहे. त्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा, शक्यतो घरात बसा, कामाकरिता घरातुन बाहेर पडताना तोंडाला मास्क लावा, सोशलडिस्टंनचा वापर करा, स्वच्छता राखा, लस घेतली नसेल तर पहिले मुरुड ग्रामीण रूग्णालयात जावुन लस घ्या असे आवाहन मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी नागरिकांना केले.