अंतुले आदर्श नेतृत्व- घरत

| म्हसळा | वार्ताहर |
समाजातील सर्वसामान्य घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारे माजी मुख्यमंत्री बॅ.अ.र.अंतुले हे राज्यासाठी आदर्श नेतृत्व होते. असे प्रशंसोद्गार काँग्रेस नेेते आर.सी.घरत यांनी काढले. अंतुले यांच्या जयंतीनिमित्त म्हसळा येथील महाविद्यालयात गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी आम. मुश्ताक अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांस जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, विचारे, नगराध्यक्ष अशल कादीरी, फझल हलडे, निलम वेटकोळी, सुहेल धनसे, समीर बनकर, दिलीप कांबळे, आजाद वतारे, अक्रम साटवीलकर, नवाज नजीर, सरोज म्हशीलकर, शाहिद उकये, शहानवाज उकये, अंजुमन चे प्राचार्य मोहमद तांबे, नासिर मिठागरे, रियाज फकिह, कागदी, अ. शकूर घनसार, खतीब, बशारत, मुबशीर जमादार, खालिद सिद्दीकी, मंगेश म्हशीलकर, प्राचार्य दिगम्बर टेकळे, आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी घरत यांनी अंतुले यांच्य नेतृत्वाचे विविध पैलू आपल्या भाषणातून सांगितले.मुश्ताक अंतुले यांनी कोकणच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन केले. महाविद्यालयात फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य दिगम्बर टेकळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भोसले यांनी केले.

Exit mobile version