। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा नगर पंचायतीला प्राप्त झालेल्या दोन मिनी ट्रॅक्टर आणि दोन थ्री व्हीलर ऑटो ट्रीपरचे लोकार्पण महीला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. म्हसळा नगर पंचायतीचे स्वच्छता मोहिमेतील काम अग्रेसर आहे. देश आणि राज्य स्तरावरील अनेक बक्षिस प्राप्त झाले असल्याने नगर पंचायतीचे स्वच्छ मोहिमेत अधिक भर म्हणुन नव्याने मदतीला कचरा विल्हेवाट रहदारीसाठी चार मिनी वाहनांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. कन्याशाळेच्या प्रांगणात आयोजित वाहन लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्ष असहल कादिरी, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, अमित शेडगे, मुख्याधिकारी विराज लबडे, महादेव पाटील, नाझिम हसवारे, छाया म्हात्रे, संजय कर्णिक, सुनिल शेडगे,य फैसल गीते, सोनल घोले,शगुप्ता जहांगिर, रियाज घराडे, रफी घरटकर, किरण पालांडे, महेश घोले, करण गायकवाड, नौशिन चोगले, सुमैया आमदनी, सरोज म्हशीलकर,मेहजबिन दळवी, नासीर मिठागरे, निकेष कोकचा, समीर काळोखे,सतीश शिगवण, संदीप चाचले, प्रकाश गाणेकर, लहू म्हात्रे, शगुप्ता जहांगीर, मुबीन हूर्जुक, कवी म्हसलाई, सूहेल कोठीवले,इर्शाद धायरेकर,ऋषाली घोसाळकर, यशवंत पवार,शाहनवाज उकये आदी मान्यवर उपस्थित होते.