। खरोशी । वार्ताहर ।
नैना प्रकल्पात रायगड जिल्ह्यातील 270 गावांचा समावेश असून त्यात आपल्या पेण मधील 78 गावांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. प्रकल्पामुळे शेतकर्याचे होणारे फायदे – तोटे समजुन घेण्यासाठी, तज्ञांकडुन आपल्याला मार्गदर्शन मिळवण्यासाठी व नैना प्रकल्प नेमका काय आहे, हे समजुन घेवून पुढील योग्य दिशा ठरवता यावी यासाठी पेण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची बैठक 15 ऑगस्टला दुपारी 3.30 वाजता, दिव या गावांतील श्री.भवानीमाता मंदिरात होणार आहे. अॅड. सुरेश ठाकूर, आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील,सरपंच अनिल ढवळे इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित रहाणार आहेत. तरी नैना प्रकल्प नेमका काय आहे, हे समजुन घेण्यासाठी बैठकीस आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन खारेपाट विभाग विकास संकल्प संघटना, सेझ विरोधी 24गांव संयुक्त संघर्ष समिती – पेण,शिवतेज युवा फाऊंडेशन – वाशी, खारेपाट शेतकरी सामाजिक संघटना छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था. भूमिपुत्र सामाजिक विकास संघटना, मूलभूत अधिकार संघर्ष समिती. पेण तालुका शेतकरी विकास मंच यांनी केले आहे.