। पेझारी । वार्ताहर ।
कोकणनामा प्रतिष्ठानच्यावतीने हॉटेल गुरुप्रसादच्या सभागृहात राज्यस्तरावर गाजत असलेल्या मॉर्निंग वॉक ग्रुप,आंबेपूर-पेझारीचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार ग्रुपचे कार्याध्यक्ष मोहनराव मंचुके आणि मॉर्निंग वॉक ग्रुपचे इतर पदाधिकारी, सदस्यांनी स्वीकारला. हा विशेष सत्कार नागेश कुळकर्णी, शरद कोरडे, श्रीकांत कवळे, नितीन अधिकारी, उमाजी केळुसकर या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा सत्कार मोहनराव मंचुके यांच्यासह प्रकाश म्हात्रे, अनिल पाटील, जी.सी. पाटील, संतान पाटील, रमेश पाटील, राजाराम धुमाळ, अनिल बांगर, प्रकाश म्हात्रे, गजानन पाटील, कमळाकर पाटील, रामचंद्र म्हात्रे, रामचंद्र पाटील, नंदकुमार राऊत, अनिल परशुराम पाटील, पांडुरंग पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, राजेंद्र म्हात्रे, निलेश गावंड, करुणाकर पाटील, विकास पाटील, श्रीकांत पाटील, सुधीर पाटील, वैकुंठ पाटील, मुकुंद म्हात्रे, संदेश पाटील यांनी स्वीकारला.