पारगावच्या स्थलांतरामागे अंतुलेंची दूरदृष्टी

सलिम तांडेल यांनी दिला आठवणीना उजाळा

| रेवदंडा | प्रतिनिधी |

काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील पारगावचे 35 वर्षापूर्वी स्थलातंर होऊन महाळुंगे गावानजीक पुनर्वसन करण्यात आले. यामागे तत्कालीन माजी मुख्यमंत्री बॅ. अ.र. अंतुले यांच्या दूरदृष्टी होती,अशी आठवण अंतुले यांचे खंदे समर्थक सलिम तांडेल यांनी सांगितली. नुकत्याच घडलेल्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्या आठवणी ताज्या असतानाच 35 वर्षापूर्वी घडलेल्या पारगावच्या आठवणीनाही यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे.

मुरूड तालुक्यातील काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील काकळघर गावाचे वरच्या भागातील डोंगरात लपलेलं पारगाव. वीस ते पंचवीस घरे, लोकवस्ती डोंगर भागात, पाणी, वीज, रस्ते आदी सर्व सामान्य जीवनाश्यक वस्तूसाठी परवड, ऐन पावसाळ्यात केव्हाही दरडी पडण्याची सुध्दा भीती होती. परंतु मांडला गावाचे पै. भाई घय्ये यांनी पारगाव गावाच्या परिस्थितीचे अवलोकन करून त्यांचा प्रयत्नाने पारगाव गाव स्थलातंरीत व्हावे, त्या गावाचे पुनवर्सन व्हावे यासाठी पस्तीस वर्षापूर्वी 1981 साली अंतुले यांच्याकडे पाठपुरावा केला.

अंतुले यांनी त्वरित तत्कालीन आम रविंद्र राऊत, तत्कालीन जिल्हाधिकारी भास्करराव पाटील, मुरूड पं.स.सभापती कै. बा.ध. म्हात्रे यांच्याशी संपर्क साधत मांडलाचे पै. भाई घय्ये यांचे सहकार्याने पारगाव गाव स्थलातंरीत करण्यात येऊन त्याचे पुनवर्सन महाळुंगे गावा नजीक करण्यात आले. आजमितीस अशाच प्रकारे जिल्हातील दरड पडण्याची भीती असलेल्या गावाचे स्थलांतर झाले असते तर माळीण, इर्शाळगड आदी दुर्घटना टाळता येऊ शकल्या असत्या, असेही तांडेल यांनी सांगितले

Exit mobile version