| रायगड | प्रतिनिधी |
अधीक्षक डाकघर रायगड विभाग यांच्या कार्यालयाद्वारे 16 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या डाक अदालतीमध्ये रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार, समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अश्या टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. या तक्रारीत सविस्तर माहितीबाबत ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली. त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा असणे आवश्यक आहे. इच्छूक ग्राहकांनी तक्रार 2 प्रतीत सुनील थळकर, अधीक्षक डाकघर रायगड विभाग यांच्याकडे 10 जूनपर्यंत पोहचेल अशी पाठवावी.असे आवाहन अधीक्षक डाकघर, रायगड यांनी केले आहे.