अनुज सरनाईकने रायगडचे नाव उंचावले

राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत सुवर्णपदक
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
संत जनार्दन स्वामी आश्रम त्र्यंबकेश्‍वर येथे 11 वी राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने सिनियर मेन 75 ते 80 वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. अनुजच्या या यशाने रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
अनुजला इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत 34 जिल्हे आणि 14 क्लबमधील 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी आ.जयवंत जाधव, इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, युवासेना जिल्हा अध्यक्ष दिपक दातीर, महिला जिल्हा प्रमुख मंदा दातीर मुकेश सोनवणे व सुरेखा येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचा बक्षिस समारंभ भारतीय पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंग, महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे खजिनदार मुकेश सोनवाणे यांच्या हस्ते झाला.

Exit mobile version