। सुधागड-पाली । वार्ताहर ।
गुरुनानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर येथे झालेल्या इंटर कॉलेज पिंच्याक सिलॅट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये अनुज याने एलकेसी कॉलेज जालंधरचे प्रतिनिधित्व केले होते. येत्या 24 व 26 मे रोजी युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू येथे होणार्या ऑल युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी गुरू नानक देव युनिव्हर्सिटीच्या संघात अनुजची निवड झाली आहे. अनुजच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांचे अनुजला मार्गदर्शन लाभले आहे.