खालापूर न.प.च्या प्रभारी मुख्याधिकारीपदी अनुप दुरे

| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपालिकेचे प्रशासक, मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे खालापूर नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली असून, मंगळवार, दि.13 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला आहे.

खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण कामानिमित्ताने रजेवर गेल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रभारी मुख्याधिकारी पदाची जबाबदारी खोपोली नगरपालिकेचे प्रशासक, मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे सोपविली आहे. दुरे यांनी खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यावर उपमुख्याधिकारी त्र्यंबक देशमुख, लेखाधिकारी सुरेश पोसतांडेल, नगर अभियंता देवेंद्र मोरखंडीकर आणि उपस्थित अधिकार्‍यांनी शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले आहे.

Exit mobile version