| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल-रामेश्वर येथील रहिवासी अपर्णा वसंत घरत यांचे दीर्घ आजाराने शनिवारी (दि. 19) अलिबाग येथील आरसीएफ रुग्णालयात निधन झाले. निधनसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. मागील वर्षभरापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजात अनेकांनी हळहळ व्यक्ती केली. कै. अपर्णा घरत यांच्या पश्चात पती वसंत घरत, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कै. अपर्णा घरत यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर चौल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अपर्णा घरत यांचा दशक्रिया विधी सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी चौल रामेश्वर येथे, तर तेरावे गुरुवार, दि. 1 मे रोजी त्यांच्या रामेश्वर मंदिराजवळील निवासस्थानी होणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.