| खरोशी | वार्ताहर |
पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेण येथील सेवाज्येष्ठ शिक्षिका अपर्णा अरविंद वाघमारे या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने शाळेत सेवापुर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे उपकार्याध्यक्ष व खजिनदार संजय कडू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, माजी मुख्याध्यापिका कलावती पाटील, जनार्दन जाधव, सेवामूर्ती अपर्णा वाघमारे, मुख्याध्यापिका विद्या घरत, मंगला साळवी, विद्या कवळे, अरविंद वाघमारे, अनुजा वाघमारे आदी मान्यवरांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सुरूवातीला शिक्षकवृंदांनी ईशस्तवन व स्वागतगीत गायन केले. सरस्वती पूजन व दीप प्रज्ज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्यावतीने सेवानिवृत्त शिक्षिका अपर्णा वाघमारे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन खणा नारळाचे ओटी भरून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित रहावे व स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे याकरिता वॉटरफिल्टर शाळेला भेट दिली. यावेळी शिक्षकांनी मनोगतात आलेला अनुभव मिळालेले सहकार्य तसेच विद्यार्थी व पालकांसाठी सतत केलेले मार्गदर्शन याबरोबरच विद्यार्थी हित जोपासण्यासाठी केलेल्या कार्याची सकारात्मक माहिती सांगितली. शेवटी आभार प्रदर्शनाने सांगता केली.






