एपीएल लाईव्ह अपडेट : एपीएल चा अंतिम सामना – आर एम सप्लायर्स झिराड विरुद्ध रायगड डायनमोझ पेझारी

| अलिबाग | सायली पाटील |
अलिबाग तालुक्यातील नांदाईपाडा मैदानावर सुरू असलेल्या अलिबाग प्रिमियर लीग या क्रिकेट सामन्यांची सलग तीन दिवसांची मालिका आज अखेर संपणार. सामन्यामध्ये सर्वच संघांनी अखेरच्या क्षणापर्यंत अतिशय उत्तम अशी खेळी करत ही स्पर्धा रंगतदार बनवली. आणि अखेरच्या दिवशीच्या सुरू झालेल्या या सामन्यांमध्ये आर एम सप्लायर्स झिराड विरुद्ध रायगड डायनमोझ पेझारी हा अंतिम सामना होणार आहे. यामध्ये रायगड डायनमोझ पेझारी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आहे.

श्रीकांत मोलगी ने पहील्या चार चेंडूतच केले तीन गडी बाद
सर्व सामने जिंकत,सर्व संकटांवर मात करत दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले असताना रायगड डायनमोझ पेझारी संघाच्या श्रीकांत मोलगी या गोलंदाजाने कमालीची खेळ करत सामन्याला सुरूवात होताच पहील्याच षटकामध्ये चार चेंडूतच आर एम सप्लायर्स झिराड संघाच्या ३ फलंदाजांना बाद केले.

Exit mobile version