| नेरळ | प्रतिनिधी |
निसर्गाने सौंदर्याची उधळण केलेल्य माथेरानमधील 11 वर्षीय चिमुकल्या केदारच्या मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. कर्क रोगाने हा विद्यार्थी नवी मुंबई येथील टाटा रुग्णालयात उपचार घेत आहे.
माथेरान शहरातील केदार सुनील सकपाळ इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. केदारला रक्तातील कर्करोगाने त्रस्त आहे. सकपाळ कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असून, पालकांची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने आपल्या मुलाच्या या आजाराबद्दल हे कुटुंब पूर्णपणे खचले आहे. केदार या बालकाची आई माथेरान शहरात रस्त्यावर लिंबू सरबत विकते आणि कुटुंब चालविण्यास हातभार लावत आहे.
वडील सुनील सकपाळ हे दिव्यांग असल्याने घरची परिस्थिती बेताचीच. त्यात एवढा मोठ्या आजाराशी सामना करणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. पण त्याच्या पालकांनी मदतीचे आवाहन करताच माथेरानमधील अनेक नागरिक सकपाळ कुटुंबाच्या मदतीला धावले आहेत. केदार सकपाळ सध्या खारघर येथील टाटा रूग्णालयात उपचार सुरु झाले. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, पण बाहेरून खरेदी करावी लागणारी औषधे यावर होणारा खर्चदेखील मोठा आहे. तो केदारच्या पालकांना न पेलवणारा आहे. तरी समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन केदारला आपल्या यथाशक्तीप्रमाणे मदत करावी, अशी विनंती केदारच्या कुटुंबियांकडून केली आहे. केदारच्या मदतीसाठी मोबाईल नंबर 8390907295 वर संपर्क साधावा, असे आवाहन सकपाळ कुटुंबाने केले आहे.







