मृताची ओळख पटवण्याचे आवाहन

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीमधे एक अनोळखी इसम नाव गाव माहित नाही. वय अंदाजे 30 वर्षे हा दिनांक 29 मार्च रोजी मौजे खोपोली गावचे हददीत आल्टा कंपनीचे समोर जुने मुंबई पुणे हायवेवर रोडवर मोटार सायकल क्र. एमएच-46 एम 6757 ही अतिवेगाने, अविचाराने हयगयीने रस्त्याचे परीस्थीतीकडे दुर्लक्ष करुन मोटार सायकल रोडवर स्लिप होवून अपघातात एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार घेत असताना मयत झाला आहे तरी वरील वर्णनाचे अनोळखी भवत याची ओळख पटवुन नातेवाईकांचा शोध घेणेकामी तसेच सदर अनोळखी व्यक्तीबाबत काही माहिती मिळून आल्यास खोपोली पोलीस ठाणे 02192.263333 वर संपर्क साधावा असे उपनिरीक्षक सुधाकर लहाने यांनी आवाहन केले आहे.

Exit mobile version