तळा पोलिसांकडून शांतता समितीची बैठक
| तळा | प्रतिनिधी |
आगामी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन तळा पोलिस ठाण्यातर्फे शहरातील नागरिकांना करण्यात आले. तळा शहरात दहीहंडी व गणेशोत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर हे सण साजरे करत असताना कोणताही गालबोट न लागता शांततेत साजरे करा असे आवाहन तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गवई यांनी केले. तळा पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.सण साजरे करत असताना आपण आपल्या पाल्यांना समजावून सांगावे. जेणेकरून तंटा वाढून शांतता भंग होणार नाही, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
पोलिस हे आपले मित्र आहेत. आपण सर्व सण उत्सव आनंदाने व शांततेत साजरे करूया. तसेच आपला पाल्य बाहेर नोकरी निमित्त जात असेल त्यावेळी तो ज्या ठिकाणी रहातो तेथिल पत्ता काम करण्याच्या ठिकाणाचा पत्ता तसेच त्याचे मित्र यांची माहीती आपल्याकडे ठेवा. असे सांगण्यात आले. यावेळी गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एखादा पोलीस बाजारपेठेत ठेवावा जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. अशी मागणी करण्यात आली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, राकेश वडके, ऍड. निलेश रातवडकर, लिलाधर खातू, कैलास पायगुडे, नमित पांढरकामे, श्रीराम कजबजे, पोलीस पाटील, व्यापारीवर्ग व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.