ओबीसी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

| मुरूड| वार्ताहर |

ओबीसींच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी (दि18) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने मुरूड तालुक्यातील ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ओबीसी महासंघ मुरूड तालुका अध्यक्ष रुपेश पाटील यांनी केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आता हा लढा थांबणार नाही तो वाढतच जाणार आहे . तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा असेही त्यांनी म्हटले आहे. विविध मागण्यासाठी हा भव्य दिव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व ओबीसी बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version