| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे ग्रामपंचायत हद्दितील नागरिकांनी ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम थकविली आहे. गावातील अनेक सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायतीचा हा कर इमानेइतबारे भरीत असतांनाच हा कर थकविणार्यांमध्ये अनेक श्रीमंत वर्गाचा समावेश आहे. त्यामुळेच या सर्व थकबाकीदारांना कर भरण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर थकबाकीदारांवरवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रमसेवक राकेश टेमघरे यांनी सांगितले.
नागोठणे ग्रामपंचायत हद्दितील सर्व घरपट्टी व पाणीपट्टी खातेधारकांची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत केव्हाच संपली आहे. त्यामुळे सर्व घरपट्टी व पाणीपट्टी खातेधारकांनी येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत आपली घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे भरणा करून होणार्या कार्यवाहीपासून आपला बचाव करावा असेही टेमघरे यांनी सांगितले आहे.