। पाली/बेणसे । वार्ताहर ।
ज्येष्ठ नागरिक संस्था कुर्डूस विभाग सन -2020/21 ची वार्षिक सभा यशवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पाटील यांनी संस्थेच्या प्रास्ताविक भाषणात वर्षभरामध्ये केलेल्या सामाजिक कार्याची माहिती लोकांपुढे विदीत केली. पोयनाड पोलीस स्टेशनचे पवार यांनी ज्येष्ठांना फसविणार्या लोकांपासून कसे सावध रहावयाचे योग्य मार्गदर्शन केले. तसेच या सभेत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रश्नावर चर्चा करून त्याचे निराकरण कसे करता येईल याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. तसेेच येत्या काळात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली.
वार्षिक सभेत संस्थेचे पदाधिकारी सुभाष म्हात्रे,अशोक पाटील,जनार्दन पाटील, रामभाऊ बांधणकर, नथुराम म्हात्रे, रघुनाथ पाटील, श्रीधर पाटील, विठाबाई म्हात्रे, मंदावती पिंगळे, वनिता पिंगळे, श्याम पिंगळे, महादेव पाटील, सखाराम पाटील, हिराचंद्र पाटील,अरविंद पाटील, घनश्याम शरमकर यांनी मोलाचे सहकार्य केले. हिराचंद्र पाटील,अरविंद पाटील यांनी सभा यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सभेचे सूत्र संचालन सुशील पिंगळे यांनी पार पाडले.