रायगड जिल्ह्यातील नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन

पनवेल | प्रतिनिधी |
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावरील संकटे दूर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. यामध्ये कोरोनासारखे महाभयंकर संकट, निसर्ग चक्रीवादळ, कोकणासह पश्चिम महाराष्ट्र महापुरात अडकला. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. मात्र हे करीत असताना दानशूर व्यक्तींची सरकारला गरज असते. एखाद्या आपत्तीवेळी सढळ हस्ते मदत करणे गरजेचे असल्यामुळे रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील यांनी रायगडाकरांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड येथे नुकताच महापूराने थैमान घातले होते, त्यातच तळीये, केवनाळे आणि गोवेलेत दरडी कोसळून मोठ्या दुर्घटना घडल्या. यामध्ये अनेक निष्पाप जीव निसर्गाने आपल्या कुशीत घेतले. तर महापुरामध्ये अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून राज्याच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मात्र नुकसानीची स्थिती पाहता नुकसानग्रस्त नागरिकांना मिळालेल्या मदतीतून ते संतुष्ट होणार नाहीत. यासाठी रायगडवासियांना एक हात मदतीचा पुढे करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याबाबत शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी आवाहन केले आहे.

Exit mobile version