मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महापारेषणकडून 1 कोटी 42 लाख 43 हजार 411 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुपुर्द केला. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी हा धनादेश सुपुर्द करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महापारेषणच्या अधिकारी, कर्मचार्यांची या योगदानाबद्दल प्रशंसा केली आहे. महापारेषणच्या अधिकारी, कर्मचार्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून हे योगदान धनादेशाच्या रुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी देण्यात आले आहे.