| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या अकरा जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून निवडल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपणार आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे 5, एकनाथ शिंदेंची शिवसेना 2, काँग्रेस 1, उद्धव ठाकरे 1 व शरद पवार गटाच्या पाठिंब्याने शेकापचे आ. जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळवण्यात अपयश आल्यानंतर उमेदवारी जाहीर करताना तीन उमेदवार ओबीसी, एक अनुसूचित जाती प्रवर्ग आणि एक मराठा समाजातून दिला आहे. पकंजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेला ज्यांची उमेदवारी कापण्यात आली अशा माजी खासदार भावना गवळी आणि माजी खासदार कृपाल तुमाने यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गरजे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.