| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. महाविकास आघाडी तर्फे शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. बुधवारी ( दि.11) कोकण भवन येथील कोकण आयुक्त कार्यालयात आमदार बाळाराम पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, शेकाप पनवेल पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, संस्था चालक, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संखेने उपस्थित होते.