सुनंदा पवार यांच्या अर्ज दाखल

| बारामती | प्रतिनिधी |

आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. याठिकाणी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. मात्र खबरदारी म्हणून आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचाही उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. सुनंदा पवार यांनी बारामती मतदारसंघातील उमेदवारी अर्ज घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सुनंदा पवार या राजेंद्र पवार यांच्या पत्नी आहेत. अजित पवार यांनीही बारामतीत डमी अर्ज घेतला होता. त्यानंतर सुनंदा पवार यांच्यासाठी शरद पवार गटाने अर्ज घेतला आहे. सुप्रिया सुळेंचा अर्ज बाद झाला तर खबरदारी म्हणून सुनंदा पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे. बारामतीत दोन्ही गटाकडून डमी अर्ज घेतल्याने याठिकाणी मतदारसंघात नवा ट्विस्ट येणार की काय अशीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबियांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

याठिकाणी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. परंतु खबरदारी म्हणून अजित पवारांकडून डमी अर्ज आणि शरद पवार गटाकडून सुनंदा पवार यांचा पूरक उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. बारामतीत यंदा पवारविरुद्ध पवार अशी लढत आहे. त्यात अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांसह इतर नातेवाईक अजित पवारांविरोधात एकटवल्याचं चित्र उभं राहिले आहे. तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील. आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार हे स्वत: आदेश द्यायचे. आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि दिल्लीवरून आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या, तर अजितदादांना ते मनाविरुद्ध असलं तरी ऐकावं लागेल. त्यामुळे ते त्याबाबतीत काय करतात हे येणार्‍या काळात पाहावं लागेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

Exit mobile version