नागरिकांची रहिवासी दाखल्यासाठी वणवण

नगरपरिषदेचा कालावधी संपल्याने गैरसोय
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचा नगराध्यक्षाचा कालावधी 29 डिसेंबर 2021 ला संपला आहे. तेव्हापासून नगरपरिषदेने नागरिकांकरिता आवश्यक असणारा रहिवासी दाखले बंद केल्याने शहरातील नागरिकांना रहिवासी दाखल्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

नगरपरिषदेची स्थापना झाल्यापासून शहरातील नागरिकांना शासकीय कामांकरिता लागणारी आवश्यक असणारे कागदपत्रे मिळत होती. त्यामधील रहिवासी दाखला हा नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या सहीने मिळत होता. नगराध्यक्षा कालावधी संपल्यामुळे नगराध्यक्षांना सहीचा अधिकार नसल्याने रहिवासी दाखला नागरिकांना मिळत नाही. परंतु मुख्याधिकारी यांना सहीचा अधिकार असताना रहिवासी दाखल बंद केल्याने नागरिकांनी नाराजी आहे.

या संदर्भात मुरुड नगरपरिषदेचे ओएस-परेश कुंभार यांना विचारणा केली असता. ते म्हणाले यापुढे नगरपरिषद मार्फत मिळणारे रहिवासी दाखले बंद करण्यात आले आहे. हे दाखले मुरुड तहसीलदार कार्यालयामधुन मिळतील. तहसीलदार येथील सेतू कार्यालयात विचारणा केली असता ते म्हणाले की. रहिवासी दाखला पाहिजे असेल तर मुरुड-जंजिरा नगरपरिषदेमधून रहिवासी दाखलाची व इतर कागदपत्रे यांची आवश्यक आहे. त्यामुळे रहिवासी दाखल मिळविण्याकरिता शहरातील नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे.

Exit mobile version