। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवकपदासाठी 77 अर्ज दाखल झाले होते. बुधवारी नामनिर्देशन छाननी आणि हरकतींच्या सुनावणीअंती निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी नगरसेवक पदासाठी असणारे 39 अर्ज वैध ठरविले. तर 19 अर्ज अवैध ठरविण्यात आले. तसेच ओबीसी प्रभागातील 19 उमेदवारांच्या अर्जाचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. या पार पडणार्या तळा नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण 77 अर्जापैकी 39 अर्ज वैध ठरले. अर्ज छाननीसाठी सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. छाननीदरम्यान सर्व इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थकांनी तळा तहसील कार्यालयात गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी अर्जांची छाननी करून उमेदवारांच्या हरकतींवर निर्णय दिला. मुख्याधिकारी माधुरी मडके या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.