। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक यांना विविध क्रीडा पुरस्कारांचे दि.26 जानेवारी 2022 रोजी वितरण करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सन 2021-22 च्या पुरस्कार वितरणासाठी क्रीडा कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 10 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराकरिता 1 जुलै 2017 ते 30 जून 2021 पर्यंतची कामगिरी ग्राह्य धरली जाईल. तरी इच्छुक खेळाडूंनी, क्रीडा मार्गदर्शकांनी दि.10 जानेवारी 2022 पूर्वी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.